Surabhi Jagdish
17 सप्टेंबर 2024 पासून पितृ पक्ष सुरू झाला असून तो 15 दिवस चालणार आहे.
असं मानलं जातं की, पितृ पक्षामध्ये पितर पृथ्वीवर येतात. यावेळी पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचतात.
असं मानलं जातं की, पूर्वज मनुष्य, प्राणी किंवा अगदी पक्ष्यांच्या रूपात तुमच्या घरात येऊ शकतात. मात्र त्यांची ओळख तुम्हाला पटणार नाही.
पितृपक्षाच्या काळात तुमच्या घरी अचानक कोणी पाहुणे, गरीब दारात आले तर चुकूनही त्यांचा अनादर करू नका. त्यांना खाऊ घाला.
पितृ पक्षात दारात गाय किंवा कुत्रा येणं देखील शुभ मानलं जातं. यावेळी त्यांनाही खायला द्या. याशिवाय चुकूनही मारू नका.
पितृ पक्षात कावळ्यांना कधीही पळवू नये. कावळ्यांना अन्न द्यावं. असं म्हणतात ते पूर्वजांपर्यंत पोहोचतं.
हिंदू धर्मात गायीला माता मानलं जात असून पितृपक्षात तिचं महत्त्व वाढतं. त्यामुळे या काळात गाईला भाकरी खायला द्या. यामुळे पितर प्रसन्न होतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.