ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलापूरच्या एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती.दरम्यान या लहान मुलं शाळेत सुरक्षित आहेत का, असा सवाल आता उपस्थित होतोय.
या हादरवणाऱ्या घटनेनंतर शाळेने एकंदरीत कोणती महत्त्वाची पावलं उचलली पाहिजेत ती पाहूया.
शाळेत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं पोलीस वेरिफीकेशन करून घ्यावं. हे काम प्रत्येक शाळेने केलं पाहिजे.
यावेळी कर्मचाऱ्यांचे डॉक्युमेंट्स, पत्ता, फोटो आणि फोन नंबर यांची माहिती घ्यावी.
शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. या कॅमेराच्या रेकॉर्डिंगचा ३० दिवसांपूर्वीचं बॅकअप घेणं शक्य असलं पहिजे
शाळेने एक विशाखा कमिटी स्थापन केली पाहिजे. ज्या माध्यमातून पालकांची समिती शाळेशी मुलांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करेल.
जर शाळेमध्ये अशी काहीही घटना घडली, तर शाळेने या घटनेबाबत टाळाटाळ करू नये. तातडीने पोलीस तक्रार करावी
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.