Chetan Bodke
भारतातील अनेक राज्यांचे सोबतच काही शहरांच्या नावात बदल झाले आहे.
त्रावणकोर- कोची आणि थिरू- कोच्ची या दोन राज्यांचे मिळून १९४९ साली त्रावणकोर- कोची हे एक राज्य झाले, या राज्याचे नाव बदलून १९५६ मध्ये केरळ करण्यात आले.
१९९६ मध्ये बॉम्बे शहराचं नाव मुंबई असं करण्यात आलं, मुंबई शहराची ग्रामदैवत म्हणून मुंबा देवीचा उल्लेख केला जातो.
मद्रास शहराचे नाव १९९६ मध्ये चेन्नई करण्यात आले.
सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक पैलूचा विचार करून कलकत्ता शहराचे २००१ मध्ये विधेयक पारित करून कोलकाता असं नाव केले.
पाँडेचेरी शहराचे नाव सप्टेंबर २००६ मध्ये पुद्दुचेरी असं नाव केलं.
आयटी हब म्हणून अवघ्या भारतात ओळख असलेल्या बँगलोर राज्याचे नाव २००६ मध्ये बंगळूरू करण्यात आले.
ओरिसा राज्याचे नाव मार्च २०११ पासून ओडिशा असे करण्यात आले.
म्हैसूर शहराचे नाव २०१४ मध्ये मैसुरु असे करण्यात आले.
कर्नाटकातील मुख्य शहरांपैकी एक प्रसिद्ध असलेल्या मंगलोर शहराचे नाव २०१४ मध्ये मंगळुरू करण्यात आले.
इलाहाबाद किंवा अलाहाबाद या शहराचे नाव २०१८मध्ये प्रयागराज करण्यात आले.
गुडगाव या शहराचे नाव एप्रिल २०१६ मध्ये गुरूग्राम असे करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.