Shivani Tichkule
चिखलदरा - अमरावती जिल्ह्यात असलेले सातपुडा पर्वतरांगांत वसलेले हे थंड हवेचे ठिकाण आहे. ह्या ठिकाणी तलाव, धबधबे आणि आसपासचा निसर्गरम्य परिसर व वन्यप्राणी बघायला मिळतात.
भंडारदरा - अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे ठिकाण आर्थर लेक साठी प्रसिद्ध आहे. कॅम्पिंग आणि ट्रेकिंग करणारी मंडळी ह्या ठिकाणाला आवर्जून भेट देतात.
महाबळेश्वर - आर्थर्स सीट ह्या पॉईंट वरून दरीचे खूप सुंदर दृश्य बघायला मिळते. महाबळेश्वर मधील सर्वात उंच पॉईंट म्हणजे एल्फिस्टन पॉईंट किंवा विल्सन पॉईंट आहे.
पाचगणी - हे महाराष्ट्रातील सुंदर आणि थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील पाच डोंगरांच्या मधोमध हे गाव वसलेले आहे.
मुन्नार - केरळचे मुन्नार हिल स्टेशन स्वर्गासारखे आहे. मुन्नार हे तीन पर्वत रांगांच्या मिलनाच्या ठिकाणी वसलेले आहे. चहाची शेती, वसाहतींचे बंगले, लहान नद्या, धबधबे आणि थंड हवामान हे या हिल स्टेशनचे वैशिष्ट्य आहे. हे ट्रेकिंग आणि माउंटन बाइकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.