Infantry Day एक आठवण...त्या उड्डाणाची...

वृत्तसंस्था

१५ आॅगस्ट, १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हापासूनच सुरु झाली काश्मीरवर वर्चस्व सांगण्याची लढाई. त्यातच पाकिस्तानने पठाण टोळीवाल्यांना काश्मीर खोऱ्यात उतरवलं...त्यांचा बिमोड करण्यासाठी सुरु झालं आॅपरेशन गुलमर्ग

टोळीवाल्यांचा बिमोड करण्यासाठी भारताने सैन्य पाठविण्याचं ठरवलं आणि २७ आॅक्टोबर १९४७ रोजी भारतीय हवाईदलाच्या डाकोटा विमानाने श्रीनगर कडे कूच केलं

Twittter - @ANI

हे डाकोटा VP 905 मोठ्या दिमाखान श्रीनगर विमानतळावर उतरलं

Twitter - @ANI

या विमानातून १ शीख रेजिमेंट श्रीनगरमध्ये उतरविण्यात आली

Twitter - @ANI

टोळीवाल्यांच्या अत्याचारांना कंटाळलेले काश्मीरी भारतीय सैन्याचं स्वागत करायला हजर होते. त्यांना भारतीय सैन्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्या प्रत्यक्षात खऱ्याही ठरल्या

Twitter - @ANI

१ शीख रेजिमेंटला काश्मीर मध्ये उतरविण्याची दिमाखदार कामगिरी एका हवाई दल अधिकाऱ्याने लिहून ठेवली आहे

Twitter - @ANI

ही टाकोटा VP 905 पुढे कित्येक वर्षे हवाई दलाच्या सेवेत होती. सैन्याला रसद पुरविणे, सैन्याची वाहतूक करणे ही अवजड कामे ही विमाने लिलया करत असत

Twitter - @ANI

यातलेच एक डाकोटा विमान पुढे त्यात काही सुधारणा करुन हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आले. 'परशूराम' असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. आजही हे विमान भारतीय हवाई दलाच्या हेरिटेज विमानांच्या ताफ्यात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Twitter - @ANI