Saam Tv
पावसाळा थंडाव्या आणि अनेक आजार आपल्या सोबत घेऊन येत. त्यातीलच काही आजार फ्रिजमधले अन्न खाल्याने होत आहेत.
पावसाळ्यात अन्न फ्रिजमध्ये ठेवून देखील अन्न खराब होत आहे का? तर आपल्या आरोग्याप्रमाणे फ्रिजची स्वच्छता राखणे तितकेच महत्त्वाचे आहे.
पावसाळ्यातही फ्रिजच्या तापमानाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात फ्रिजचे तापमान १ ते ४ डिग्री दरम्यान असणे आवश्यक आहे. तापमान जास्त असल्यास अन्न लवकर खराब होऊ शकते.
गरमागरम जेवण फ्रिजमध्ये ठेवू नका. अन्न व्यवस्थित थंड झाल्यावरच फ्रिजमध्ये ठेवा.
फ्रिजमधे जास्त वेळ अन्न ठेवू नका. २४ ते ४८ तासांच्या आत अन्न फ्रिजमधून काढावे,नाहीतर खराब होण्याची शक्यता असते.
फ्रिजमध्ये अन्न झाकून ठेवा. उघड्या भांड्यात ठेवल्यास ओलावा किंवा बॅक्टेरिया जाण्याची शक्यता असते. नेहमी एअरटाईट कंटेनर वापरा.
सांडलेले पदार्थ, दुर्गंधी आणि बुरशीमुळे इतर अन्नपदार्थ खराब होऊ शकतात. आठवड्यातून एकदा फ्रिज आठवणीने स्वच्छ करा.
वास बदलणे, रंग बदलणे, चिकटपणा, बुरशी ही अन्न खराब होण्याची लक्षणे आहेत. असे पदार्थ खाणे टाळा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत