Mangalagauri Vrat : मंगळागौरी व्रताची पूजा कधी, कशी आणि का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Saam Tv

मंगळागौरी व्रत म्हणजे काय?

मंगळागौरी व्रत हे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी केले जाणारे माता पार्वतीचे व्रत आहे. विशेषत: नवविवाहित महिला हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी करतात.

Mangalagauri Vrat | GOOGLE

मंगळागौरी व्रताचा इतिहास

पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीमुळे हे व्रत सुरू झाले. देवी मंगळागौरीची श्रद्धेने पूजा केल्यास वैवाहिक जीवनतील अडचणी दूर होतात. अशी मान्यता आहे.

Mangalagauri Vrat | GOOGLE

मंगळागौरीची पूजा कशी करावी

सकाळी स्नान करून कपडे घालून देवीची स्थापना करावी. हळद - कुंकू, फुले,फळे अक्षता, नैवेद्य, विड्याची पाने, पंचामृत, दिवा अर्पण करावा. मंगळागौरी व्रताच्या कथेचे वाचन करावे.

Mangalagauri Vrat | GOOGLE

मंगळागौरीचा नैवेद्य

प्रदेशानुसार नैवेद्य हा बदलतो. पुरणपोळी, खीर, मोदक, लाडू, पंचखाद्य, फळे आणि गोड पदार्थ देवीला अर्पण केले जातात .

Mangalagauri Vrat | GOOGLE

मंगळागौरीचे खेळ

पूजेनंतर महिलांमध्ये फुगडी, झिम्मा, पिंगा, उखाणे , गाणी आणि पारंपरिक खेळ खेळण्याची परंपरा आहे. मंगळागौरीचे खेळ खेळल्याने शरीराचा देखील चांगला व्यायाम होतो.

Mangalagauri Vrat | GOOGLE

मंगळागौरी व्रताचे महत्त्व

हे व्रत अखंड सौभाग्य, पतीचे आरोग्य, कुटुंबाचे सुख-समृद्धी आणि मानसिक शांततेसाठी केले जाते. अनेक ठिकाणी हे व्रत एकदा सुरू केल्यास सलग ५ वर्षे करण्याची प्रथा आहे.

Mangalagauri Vrat | GOOGLE

स्त्रियांचा उत्सव

मंगळागौरी हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्रियांचा उत्सव आहे. एकोपा, परंपरा, संस्कृती आणि कौटुंबिक नात्यांना मजबूत करणारा सण आहे.

Mangalagauri Vrat | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Mangalagauri Vrat | GOOGLE

Fitness Tips : घरबसल्या मिळवा जिमसारखा फिटनेस; फक्त ५ मिनिटांचा Workout

FITNESS TIPS | CHATGPT
येथे क्लिक करा