Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर

कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे, ज्यात शरीरातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि इतर निरोगी पेशींवर आक्रमण करतात.

कॅन्सरचा प्रकार

कॅन्सरच्या प्रकारानुसार आणि तो शरीराच्या कोणत्या भागात आहे यावर शरीरातील बदल अवलंबून असतात, पण काही सामान्य आणि मोठे बदल दिसून येतात.

शरीरात गाठी तयार होणं

शरीराच्या कोणत्याही भागात नवीन गाठ तयार होणं हे कॅन्सरचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. ही गाठ सामान्यतः वेदनाहीन असते आणि ती वेगाने वाढू शकते.

अवाजवी वजन घटणं

कोणताही आहार किंवा व्यायाम न करता अचानक वजन कमी होणं हे कॅन्सरचं एक मोठं लक्षण आहे. कॅन्सरच्या पेशी शरीरातील पोषण घटक वापरून टाकतात, ज्यामुळे शरीराचे वजन झपाट्याने घटतं.

अशक्तपणा

आराम केल्यानंतरही सतत थकवा जाणवणं हे कॅन्सरचे एक सामान्य लक्षण आहे. शरीरातील कॅन्सरच्या वाढीमुळे ऊर्जा कमी होते आणि अशक्तपणा येतो.

त्वचेतील बदल

त्वचेवर नवीन तीळ येणं हे त्वचेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

असामान्य रक्तस्त्राव

नाकातून, लघवीतून, शौचातून, खोकल्यातून, किंवा मासिक पाळी थांबल्यानंतर योनीतून अचानक रक्तस्त्राव होणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकते.

एकांतात मुली गुगलवर काय सर्च करतात? वाचून तुम्हाला बसेल धक्का

येथे क्लिक करा