Chetan Bodke
दाक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही कायम तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांध्ये चर्चेत असते.
अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पुष्पा मधील ‘उ अंटावा’ गाण्यानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू सर्वाधिक प्रकाशझोतात आली.
समांथाने आपल्या अभिनयामुळे सोशल मीडियावर सर्वाधिक चाहतावर्ग कमावला.
समांथा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच समांथाने इन्स्टाग्रामवर रेड कलरची शिमरी साडी वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या समांथाने कॅमेऱ्यासमोर हटक्या अंदाजात फोटोशूट केलं आहे.
लूकला साजेसे दागिने परिधान केले असून ग्लॉसी मेकअप अभिनेत्रीने केला आहे.
समांथाच्या फोटोंमधील सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.