Manasvi Choudhary
मुंबई या ठिकाणी जगभरातून लाखो पर्यटक भेट देतात. मुंबई या शहरात वर्षभर पर्यटकांची गर्दी असते.
तुम्हाला देखील मुंबई सफर करायची असल्यास मुंबईतील या प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या.
गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचे सर्वात मुख्य आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी असते. येथून तुम्ही अरबी समुद्राचे सुंदर दृश्य पाहू शकता आणि एलिफंटा लेण्यांकडे जाण्यासाठी बोटीचा मार्ग आहे.
मरीन ड्राईव्ह हे मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण आहे. सायंकाळच्या वेळी मरीन ड्राईव्हवर पर्यटक भेट देतात. शांतता अनुभवण्यासाठी गर्दी करतात.
प्रभादेवी येथील हे गणपतीचे मंदिर केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथे दर्शनासाठी दररोज हजारो भाविकांची गर्दी होते.
मुंबईतील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध समुद्रकिनारा. येथे पर्यटकांची गर्दी फक्त समुद्रासाठीच नाही, तर येथील प्रसिद्ध स्ट्रीट फूड जसे की पावभाजी, भेळपुरी आणि कुल्फी खाण्यासाठी सुद्धा असते.
हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ असून जगातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकांपैकी एक मानले जाते. याच्या विक्टोरियन गोथिक वास्तुकलेचा आनंद घेण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी होते