Manasvi Choudhary
महिलांच्या फॅशनमध्ये 'कम्फर्ट विथ स्टाईल' या लूकसाठी काही जीन्स पॅटर्न ट्रेडिंगमध्ये आहेत.
लेग जीन्स हा जीन्स पॅटर्न' ट्रेंडमध्ये आहे. ही जीन्स कंबरेपाशी फिट असते, गुडघ्यापाशी गोलाकार पसरते आणि घोट्यापाशी पुन्हा निमुळती होते.
कंबरेपासून खालपर्यंत पूर्णपणे सैल असणारी ही जीन्स प्रचंड आरामदायी असते. उंच दिसण्यासाठी आणि प्रोफेशनल लूकसाठी या जीन्सची निवड तुम्ही करू शकता.
कार्गो डेनिम जीन्समध्ये पॉकेट्स आणि युटिलिटी लूक असलेली ही जीन्स प्रवासासाठी आणि कॅज्युअल आउटिंगसाठी उत्तम आहे.
९० च्या दशकातील ही फॅशन आजही ट्रेडिंगमध्ये आहे. गुडघ्यापर्यंत फिट आणि खालच्या बाजूला हलकासा 'फ्लेअर'कट ही जीन्स असते.
जीन्सला खालच्या बाजूने मोठा फोल्ड करण्याची अनोखी फॅशन आहे. हे डिझाईन हिल्स किंवा प्लॅटफॉर्म शूजवर खूप स्टायलिश दिसते.
जीन्ससोबत 'क्रॉप टॉप' किंवा 'ओव्हरसाईज्ड शर्ट' इन करून घालण्याचा ट्रेंड आहे यामुळे तुमचा लूक अधिक मॉडर्न आणि सुटसुटीत वाटतो.