Manasvi Choudhary
मकरसंक्रातीला काळ्या रंगाची साडी परिधान केली जाते. काळ्या रंगाच्या साडीवर तुम्ही कोणते ब्लाऊज परिधान करू शकता हे जाणून घेऊया.
काळ्या साडीवर तुम्ही सोनेरी काठ असलेला ब्लाऊज परिधान करू शकता. कोपरपर्यंत हात असलेला हा ब्लाऊज आकर्षक दिसेल.
साडीच्या काठाच्या शेड्सचा ब्लाऊज तुम्ही परिधान करू शकता मॅचिंग स्टाईल लूक एकदम परफेक्ट दिसेल.
साध्या टिश्यू सिल्क किंवा नेटच्या साडीवर सोनेरी किंवा तांबूस रंगाचे ब्लाऊज तुम्ही परिधान करू शकता.
साडी पूर्ण काळ्या रंगाची असेल तर तुम्ही त्यावर मरून किंवा डार्क ग्रीन रंगाचे वेलवेट ब्लाऊज परिधान करू शकता यामुळे लूक रॉयल वाटतो.
खण साडीवर किंवा सिल्क साडीवर तुम्ही कोपरापर्यंत पफ असलेले ब्लाऊज परिधान करू शकता.