Surabhi Jayashree Jagdish
मुंबईत राहता आणि एका दिवसात हिल स्टेशनवर जाऊन यायचंय. आम्ही तुम्हाला आज एका सुंदर हिल स्टेशनबद्दल सांगणार आहोत. हे भारतातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक मानलं जातं.
महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेलं माथेरान एक छोटंसं पण आकर्षक हिल स्टेशन आहे. हे रायगड जिल्ह्यात स्थित असून पर्यटकांचं आवडतं ठिकाण बनलं आहे. शांत आणि थंड वातावरण प्रत्येकाला आवडतं.
माथेरान हे मुंबईपासून सुमारे 83 किलोमीटर अंतरावर आहे. वीकेंड ट्रिपसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम मानलं जातं. मुंबईकर मोठ्या प्रमाणात याठिकाणी फिरण्यासाठी येतात.
समुद्रसपाटीपासून सुमारे 2625 फूट उंचीवर माथेरान वसलेलं आहे. उंच डोंगर आणि हिरवाळीमुळे इथलं हवामान नेहमी आल्हाददायक असतं. पावसाळ्यात या ठिकाणाचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं.
जर तुम्ही महाराष्ट्र फिरण्याचा प्लॅन करत असाल तर माथेरानला नक्की भेट द्या. कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. याठिकाणचा निसर्ग प्रत्येक पर्यटकाला भुरळ घालतो.
माथेरान बहुतेक वेळा ढगांनी वेढलेलं दिसतं. इथलं थंड वातावरण आणि सुंदर दृश्यं पर्यटकांना आकर्षित करतात. भारतातीलच नव्हे तर विदेशी पर्यटकही आवर्जून भेट देतात.
हे ठिकाण दाट जंगल, वेगवेगळे पॉईंट्स आणि सुंदर धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. निसर्गप्रेमींसाठी माथेरान म्हणजे एखादं स्वर्गासारखं ठिकाण आहे. त्यामुळे येत्या विकेंडला इथे नक्की जा.