Home Cleaning Tricks : बाथरूममधील गोष्टी एक्सपायर्ड डेट संपली म्हणून फेकून देता? जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे

Saam Tv

बाथरूम शेल्फ

घरात साफसफाई करताना बाथरूमच्या शेल्फकडे आपलं लक्ष बऱ्याचदा जात नाही. त्यामुळे न वापरताच अनेक गोष्टींची एक्सपायर्ड डेट संपलेली असते मग आपण त्या वस्तू फेकून देतो.

BATHROOM SHELF | PINTREST

घरातील गोष्टी होतील स्वच्छ

पण तुम्हाला माहित आहे का? या वस्तूंचा फक्त बाथरूमपुरताच वापर होत नाही. काही घरातील गोष्टींना दुरूस्त करण्यासाठी तुम्ही या वस्तूंचा वापर करू शकता.

HOME TIPS | PINTREST

उरलेला साबणाचा तुकडा

वापरून झाल्यावर शेवटी उरणारा साबणाचा तुकडा फेकून न देता घट्ट झालेली चैन,स्क्रू किंवा खिळंयावर घासल्याने पकड सैल होते. शिवाय साबणाच्या तुकड्याला कागदात गुंडाळून बूटांमध्ये ठेवल्याने बूटांचा वास कमी होतो.

HOME TIPS | PINTREST

एक्सपायर्ड शॅम्पूने होईल स्वच्छता

शॅम्पूमध्ये क्लीनींग एजंट असतात. त्यामुळे बाथरूमच्या टाईल्स, भांड्यावरील चिकटपणा साफ करण्यासाठी शॅम्पूचा वापर करता येतो.

HOME TIPS | PINTREST

कंडिशनरने दरवाजा होईल चकचकीत

केसांसाठी वापरल्या जाणाऱ्या कंडिशनरमध्ये मॉश्चराईंझिंग एजंट असतो. त्यामुळे किरकिर आवाज करणाऱ्या दरवाज्यावर किंवा मेटलची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.

HOME TIPS | PINTREST

स्पंज किंवा बॉडी स्क्रब

जास्त वेळ स्पंज वापरणे हायजिनसाठी चांगले नसते, त्यामुळे तो आपण फेकून देतो. पण फेकून देण्याऐवजी छोट्या छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी पाऊच म्हणून देखील वापरू शकता.

HOME TIPS | PINTREST

डियोड्रंट

जिद्दी डाग काढण्यासाठी डियोड्रंटचा वापर करू शकता.बूटांमधील घाण वास घालवण्यासाठी देखील याचा वापर करू शकता.

HOME TIPS | PINTREST

टूथपेस्ट आणि टूथब्रश

टूथपेस्टमध्ये क्लिनींग एजंट असतात. चांदीची, पितळेची भांडी याच्या मदतीने स्वच्छ करता येतात.

HOME TIPS | PINTREST

Parenting Tips : गायीचं की म्हशीचं? बाळाच्या आरोग्यासाठी कोणतं दूध जास्त फायदेशीर?

best milk for kids | meta ai
येथे क्लिक करा