Saam Tv
लहान मुलांच्या आरोग्याची आपण सतत काळजी करत असतो. कोणती गोष्ट त्यांना खायला द्यावी, कोणत्या गोष्टींमुळे त्यांना त्रास होईल याची काळजी आपल्याला लागलेली असते.
लहान मुलांसाठी सर्वात पौष्टिक असत ते म्हणजे दूध. यामुळे हाडे मजबूत होतात. कॅल्शिअमचे प्रमाण वाढते. दूधामुळे बाळ सुदृढ होते.
पण बाळ वर्षाच झाल्यावर सगळ्यात आधी नवीन पालकांसमोर हाच प्रश्न उभा राहतो, की बाळाला नक्की गायीचे दूध द्यावे की म्हशीचे
गायीच्या दूधात फॅट्स कमी असतात त्यामुळे ते पचायला हलके असते. लहान मुलांच्या पचनावर जास्त दबाव येत नाही. गाईच्या दूधामुळे अॅलर्जी होण्याची शक्यता फार कमी असते.
म्हशीच्या दूधात कॅल्शिअम, लोह आणि व्हिटॅमिन बी १२ जास्त प्रमाणात असत, ज्यामुळे रक्त निर्मिती, हाडांचा विकास पटकन होतो पण ते पचनास जड असते. त्यामुळे लहान बाळांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
तान्ह्या बाळांसाठी गायीचे दूध फायदेशीर असते तर मोठ्या मुलांसाठी म्हशीचे दूध एकदम उत्तम
बाळाला पहिल्यांदा कोणतेही दूध देताना व्यवस्थित उकळून द्यावे. सुरूवातीला दुधाचे प्रमाण कमी ठेवावे, बाळाला त्रास होत नसेल तर प्रमाण वाढवावे.
१ वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना गाय किंवा म्हैस यांपैकी कोणचेही दूध देऊ नये कारण लहान बाळांमध्ये पचनशक्ती कमी असल्याने किडनीच्या त्रास, अॅनिमियाचा त्रास होऊ शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.