Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

Saam Tv

गुणकारी अॅलोवेरा

अॅलोवेरा हे चेहऱ्यासोबतच केसांसाठी देखील अत्यंत गुणकारी मानले जाते. अॅलोवेरा किंवा त्याचे मिश्रण केसांना लावल्याने चिकट, तेलकट झालेले केस सिल्की होण्यास मदत होते.

Aleovera Benifits | PINTREST

केसांचे मॉइश्चरायझर

नारळाचे तेल हे केसांना पोषक तत्त्वे पुरवते आणि ते मॉइश्चरायझरसारखे काम करते. २ चमचे अॅलोवेरा जेलमध्ये १ चमचा नारळाचे तेल मिक्स करा. पुढे ३० मिनिटे लावून शॅम्पूने केस स्वच्छ धुवा.

Aleovera Benifits | PINTREST

मऊ आणि हेल्दी केसांसाठी

कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी अॅलोवेरा, दही, मध यांची पेस्ट ओल्या केसांवर लावा. यामुळे तुमचे केस मऊ आणि हेल्दी दिसतील.

Aleovera Benifits | PINTREST

कोंडा कमी करण्यासाठी

अॅलोवेराच्या गराची पातळ पेस्ट करा. ही पेस्ट संपूर्ण स्कॅल्पला व्यवस्थित लावा. ताज्या अॅलोवेराचा जेल केसांना लावून केसातील कोंडा कमी करण्याचा हा उत्तम उपाय आहे.

Aleovera Benifits | PINTREST

कोरड्या आणि फ्रिजी केसांसाठी

अॅलोवेरा आणि पिकलेल्या केळ्याचा हेअर मास्क कोरड्या आणि फ्रिजी केसांसाठी अत्यंत गुणकारी आहे. यामुळे केसांना खोलवर पोषण आणि मऊपणा मिळतो. हे मिश्रण केसांवर ३० मिनिटे ठेवावे.

Aleovera Benifits | PINTREST

ग्लास -लाईक शाईन

रात्रभर भिजवलेली मेथी, कडीपत्ता आणि अॅलोवेरा जेल यांचे मिश्रण केसांना लावल्याने केस गळती थांबून केसांना ग्लास -लाईक शाईन मिळते.

Aleovera Benifits | PINTREST

अॅलोवेरा वापरताना काळजी

जर तुम्ही थेट झाडाचे ताजे कोरफडीचे पान वापरत असाल, तर ते कापल्यानंतर काही वेळ उभे ठेवा जेणेकरून त्यातील पिवळा द्राव निघून जाऊदेत , कारण यामुळे काहींना खाज सुटू शकते.

Aleovera Benifits | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Aleovera-Benifits | PINTREST

Breathing Problems : नाक बंद झालय? श्वास घ्यायला त्रास होतोय? तर घरच्या घरी करा 'हे' सोपे उपाय

Breathing Problems | meta ai
येथे क्लिक करा