Saam Tv
पावसाळा सुरू झाला की अनेक आजार तोंड वर काढतात. त्यात जर आपण पावसात भिजलो तर तब्बेत आणखीच बिघडते. सर्दी, खोकला, कफ यांचा त्रास व्हायला सुरूवात होते.
थंड वातावरणामुळे अनेक अॅलर्जी होतात आणि सगळ्यात आधी नाक बंद व्हायला सुरूवात होते. त्यामुळे नीट श्वास घेता येत नाही आणि अशा वेळी काय करावे ते सुचत नाही.
पाण्यात निलगिरी तेल टाका. डोक्यावर टॉवेल झाकून १५ ते २० मिनिटे वाफ घ्या. यामुळे छातीत जमलेला कफ पातळ होतो आणि श्वास घेणे सोपे होते.
अॅलर्जी असताना कोणतेही थंड पदार्थ खाल्ल्यास किंवा प्यायल्यास नाक आणखी चोंदू शकते. त्यासाठी गरम पेयांचे म्हणजेच सूप, आल्याचा चहा, कोमट पाणी पिण्यास सुरुवात करा.
१-२ चमचे ओवा तव्यावर गरम करून मऊ कपड्यात बांधून ठेवा. ही पोटली वेळोवेळी श्वास घेताना नाकाजवळ ठेवल्याने नाक हळू हळू उघडण्यास मदत होते.
लहान मुलांचे नाक बंद झाल्यास जुना उपाय म्हणजे नाकात मोहरीच्या तेलाचे १ ते २ थेंब टाकून झोपावे. त्यामुळे बंद झालेले नाक मोकळे होण्यास मदत होते.
नाक चोंदले असेल तर अशा वेळी काही काढे गुणकारी ठरतात. तुळशीची पाने, २ ते ३ लवंग, आल्याचा तुकडा, काळीमीरी उकळून प्यावे. यामुळे घशाला आराम मिळतो.
हळद ही सगळ्या आजारांवर गुणकारी असते. कोमट दुधात चिमूटभर हळद आणि थोडा मध टाकून प्यायल्याने बंद नाक उघडण्यास मदत होते.
कोमट पाण्यात थोडा लिंबू पिळून त्यात मध मिसळल्याने कफ कमी होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.