Saam Tv
अॅलोवेरामध्ये जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स असतात. हे नखांना आवश्यक पोषण देऊन त्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.
कोरडेपणामुळे नखे लवकर तुटतात. अॅलोवेरा नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करून नखांमधील ओलावा टिकवून ठेवतो.
अॅलोवेरा जेल क्युटिकल्स मऊ ठेवण्यास मदत करते. त्यामुळे नखांच्या आसपासची त्वचा कोरडी पडत नाही.
नियमित वापरामुळे नखांचा कमकुवतपणा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे नखे तुटण्याची शक्यता कमी होते.
ताजे अॅलोवेरा जेल नखांवर आणि क्युटिकल्सवर लावा. १० ते १५ मिनिटे ठेवून नंतर कोमट पाण्याने धुवा किंवा रात्रभर तसेच ठेवा.
अॅलोवेरा जेलमध्ये काही थेंब व्हिटामिन ई किंवा बदाम तेल मिसळून लावल्यास नख आणखी सुंदर आणी बोट मऊ होतात.
पुरेसे पाणी आणि नखांची नियमित स्वच्छता यामुळे नखे निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.