Kitchen Hacks : कांदा-लसणाचा उग्र वास चॉपिंग बोर्डवर चिकटलाय? मिनिटांत गायब करतील 'हे' ५ भन्नाट जुगाड

Shreya Maskar

चॉपिंग बोर्डवरील दुर्गंधी कशी घालवावी?

स्वयंपाकघरात भाज्या, फळे, कांदा, लसूण आणि मासे कापण्यासाठी चॉपिंग बोर्डचा वापर केला जातो. मात्र, अनेकदा बोर्ड स्वच्छ धुतल्यानंतरही त्यातून विचित्र वास येतो. विशेषतः कांदा, लसूण आणि मासे कापल्यानंतर हा वास अधिक जाणवतो. काही सोप्या घरगुती उपायांनी चॉपिंग बोर्डवरील दुर्गंधी कमी करता येते.

chopping board | pinterest

लिंबाचा वापर करा

लिंबाचे दोन तुकडे करून चॉपिंग बोर्डवर चोळा. काही मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. लिंबामुळे दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.

Use lemon | pinterest

बेकिंग सोड्याचा वापर करा

चॉपिंग बोर्डवर थोडा बेकिंग सोडा पसरवा. त्यात थोडे पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट बोर्डवर चोळून काही मिनिटांनी स्वच्छ धुवा.

Use baking soda | pinterest

पांढऱ्या व्हिनेगरने स्वच्छ करा

पांढऱ्या व्हिनेगरमध्ये कापड भिजवून चॉपिंग बोर्ड पुसून घ्या. यामुळे दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. त्यानंतर बोर्ड स्वच्छ धुवा आणि पूर्णपणे कोरडा करा.

Clean with white vinegar | pinterest

मीठ - लिंबाचा उपाय

चॉपिंग बोर्डवर थोडे जाड मीठ टाका. त्यावर लिंबाचा अर्धा तुकडा घेऊन गोलाकार पद्धतीने चोळा. काही मिनिटांनी बोर्ड पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय बोर्डवरील डाग आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करू शकतो.

Salt-Lemon Solution | pinterest

गरम पाण्याने स्वच्छ धुवा

चॉपिंग बोर्ड वापरल्यानंतर लगेच साबण आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. विशेषतः मासे, चिकन किंवा मांस कापल्यानंतर स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्या. प्लास्टिक बोर्ड उत्पादकाच्या सूचनांनुसार स्वच्छ करा.

warm water | pinterest

चॉपिंग बोर्ड पूर्णपणे वाळवा

बोर्ड धुतल्यानंतर लगेच बंद कपाटात ठेवू नका. स्वच्छ कापडाने पुसून हवेशीर जागेत पूर्णपणे वाळवा. ओलावा राहिल्यास दुर्गंधी आणि बुरशी निर्माण होण्याची शक्यता वाढते.

Dry the chopping board | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | pinterest

NEXT : जेवणात जास्त मीठ खाताय? रात्रीच्या झोपेवर होऊ शकतो गंभीर परिणाम

Salt- Sleep | AI PHOTO
येथे क्लिक करा...