Sakshi Sunil Jadhav
चपाती प्रत्येकाच्या रोजच्या जेवणातला महत्वाचा भाग आहे. पण अनेकदा चपाती कडक, वातड किंवा न फुगलेली होते.
जर तुम्हालाही अशी समस्या येत असेल, तर खालील 5 टिप्स लक्षात ठेवा . यामुळे चपात्या मऊ, फुगलेल्या आणि स्वादिष्ट बनतील.
चपातीसाठी नेहमी ताजे आणि बारीक गव्हाचे पीठ वापरा. जास्त जुनं पीठ वापरल्यास चपाती कडक होण्याची शक्यता असते.
पीठ मळताना त्यात एक चिमूटभर मीठ आणि एक चमचा तेल घालून मळा. यामुळे चपात्या मऊ होतात आणि पचायलाही हलक्या राहतात.
थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याने कणिक मळल्यास ती लवचिक बनते आणि चपाती फुगण्यास मदत करते.
कणिक नीट आणि पुरेशी वेळ मळा. घट्ट कणिक मळल्यास चपाती वातड होते, तर मऊ मळल्यास ती फुगते.
मळल्यानंतर कणिक सुती कापडाने झाकून १५-२० मिनिटे ठेवा. यामुळे पीठ मुरते आणि चपाती अधिक लवचिक बनते.
लाटण्यापूर्वी प्रत्येक गोळा पुन्हा एकदा मळून घ्या. यामुळे चपाती गुळगुळीत आणि समान फुगते.