मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आहाराची योग्य निवड करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. काही भाज्यांमध्ये भरपूर फायबर, पाणी आणि पोषक घटक असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत मिळू शकते.
या भाज्या संतुलित आहाराचा भाग म्हणून नियमित प्रमाणात खाल्ल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. मात्र केवळ भाज्या खाल्ल्याने मधुमेह बरा होत नाही, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेला उपचार आणि जीवनशैली यांचे पालन करणं आवश्यक आहे.
कारलं ही मधुमेहींसाठी वरदान मानलं जातं. कारल्यामध्ये भरपूर फायबर असतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे संतुलित आहारामध्ये कारल्याचा समावेश केल्यास ब्लड शुगर मॅनेज करण्यासाठी फायदा होऊ शकतो.
कारल्यामध्ये असलेले फायबर अन्नाचं पचन आणि ग्लुकोजचं शोषण संथ गतीने होण्यास मदत करतात. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर झपाट्याने वाढण्याची शक्यता कमी होऊ शकते. यामुळे ब्लड शुगर अधिक स्थिर ठेवण्यास मदत मिळते.
दुधी भोपळ्यामध्ये सुमारे ९२ टक्के पाणी आणि मुबलक फायबर असतं. ही भाजी हलकी, सहज पचणारी आणि कमी कॅलरीयुक्त असल्यामुळे मधुमेहींसाठी योग्य पर्याय मानली जाते. यामुळे रक्तातील साखरेचं नियंत्रण राखण्यास मदत होऊ शकते.
दुधी भोपळ्यातील फायबर आणि पाण्याचं प्रमाण जेवणानंतर ग्लुकोजचं शोषण वेगाने करत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याचा धोका कमी होऊ शकतो. याच कारणामुळे ही भाजी मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त मानली जाते.
भेंडीमध्ये फायबर आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीरात ग्लुकोजचं शोषण नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे संतुलित आहारात भेंडीचा समावेश केल्यास ब्लड शुगर मॅनेज करायला मदत होते.