High Blood Pressure : फक्त एका गोष्टीमुळे रक्तदाब राहणार कंट्रोलमध्ये, वाचा हाय BP च्या रुग्णांचे रूटीन कसं असावं?

Shreya Maskar

हाय ब्लड प्रेशर

उच्च रक्तदाब पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, पण तो नियंत्रणात ठेवता येतो. निरोगी जीवनशैली आणि औषधोपचारामुळे रक्तदाबाचे रूपांतर हायपरटेन्शनमध्ये होण्यापासून रोखता येते. त्यासाठी लाइफस्टाइलचे हेल्दी रूटीन बनवा.

High Blood Pressure | pinterest

निरोगी आहार

उच्च रक्तदाब टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. तेलकट, जंकफूड खाणे टाळा. आपल्या आहारात फळे, भाज्या आणि कडधान्यांचा समावेश करा. प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा.

Healthy Diet | pinterest

जेवण- ब्रेकफास्ट

नियमित दोन वेळेचे जेवण आणि ब्रेकफास्ट करा. तसेच औषधांच्या वेळांचे पालन करा. भरपूर पाणी प्या आणि जेवणात मीठाचे प्रमाण एकदम कमी करा.

Meals and Breakfast | pinterest

मीठ कमी

शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढू नये यासाठी अन्नातील मिठाच्या प्रमाणाकडे बारकाईने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शरीरात मीठ जास्त झाले तर, उच्च रक्तदाबासोबत हृदयविकार, स्ट्रोक, किडनीचे गंभीर आजार उद्भवतात. डोके दुखी वाढते.

Salt | pinterest

नियमित व्यायाम

उच्च रक्तदाबासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. रोज २०-३० मिनिटे व्यायाम करा. यात शरीराला भारी वाटेल असे व्यायाम टाळा. त्याऐवजी चाला, सकाळी जॉगिंगला जा. योगा आणि प्राणायाम करा.

Exercise | pinterest

वजन नियंत्रण

वजन कमी केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे सोपे होऊ शकते. निरोगी बॉडी मास इंडेक्स (BMI) राखल्याने खूप गरजेचे आहे. त्यामुळे अति खाणे टाळा आणि हेल्दी खा.

Weight | pinterest

दारू -धूम्रपान नको

अति मद्यपान, धूम्रपान केल्याने रक्तदाब वाढतो. हे दोन्ही घटक उच्च रक्तदाब वाढवण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका निर्माण करण्यासाठी प्रमुख कारणे आहेत.

Alcohol | pinterest

टेन्शन सोडा

रोजच्या तणावाचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेन्शन घेणे सोडा आणि आनंदी रहा. ध्यान, योग आणि दीर्घ श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करा. यामुळे उच्च रक्तदाबाची पातळी कमी होते.

Stress | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : हाय BP च्या रुग्णांसाठी ५ पदार्थ अमृतासमान, आजपासूनच खायला करा सुरूवात

High Blood Pressure | saam tv
येथे क्लिक करा...