Chetan Bodke
शाहरुख आणि तापसी पन्नुचा ‘डंकी’ चित्रपट येत्या २१ डिसेंबरला रिलीज होणार आहे.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना चित्रपटाबद्दलची उत्सुकता आहे.
‘डंकी’मध्ये, शाहरुखसोबत तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, सतीश शाह हे सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटासाठी शाहरुख खानने २८ कोटी इतकं मानधन घेतलं आहे.
बोमन इराणी यांनी चित्रपटासाठी १५ कोटींचं मानधन घेतलं आहे.
सतीश शाहने चित्रपटासाठी ७ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.
सोबतच तापसी पन्नुने या चित्रपटासाठी ११ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.
तर विकी कौशलने या चित्रपटासाठी १२ कोटीचं मानधन घेतलं आहे.
शाहरुखचा हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक चित्रपट असून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दलची उत्सुकता आहे.