Chetan Bodke
मराठी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर.
उर्मिला मातोंडकर ९० च्या दशकातील फिल्मी दुनियेतील प्रसिद्ध अभिनेत्री होती.
ती अभिनेत्री असून ती उत्तम राजकारणी देखील आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उर्मिला फिल्मी दुनियेपासून दूर असून राजकारणात सक्रिय आहे.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.
पिंक वनपिस गाऊन वेअर करत अभिनेत्रीने हटके पोजेस देत फोटोशूट केले.
ओपन हेअर आणि ग्लॉसी मेकअप असा स्टायलिश अंदाज तिचा फोटोत दिसत आहे.
उर्मिलाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.