Saam Tv
लिपस्टिक लावताना आपल्या स्किनटोन सर्वात महत्त्वाचा असतो. त्याआधारेच लिपस्टिक निवडावी तरच ती चेहऱ्याला शोभून दिसते .
स्किनटोनसोबतच अंडरटोन ओळखणेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. वॉर्म, कुल, मध्यम असे अंडरटोनचे प्रकार असतात.
वॉर्म अंडरटोनसाठी कोरल, ऑरेंज बेस्ड शेड्स, रेड, ब्रिक रेड, कॅरेमेल, टेराकोटा ब्राऊन हे शेड्स बेस्ट असतात.
कुल अंडरटोनसाठी बेरी, प्लम,मव, पिंक आणि ब्लू - बेस्ड रेड शेड्स योग्य ठरतात.
जर तुमचा न्यूट्रल अंडरटोन असेल तर तुम्ही वॉर्म आणि कुल दोन्ही प्रकारात मोडणाऱ्या लिपस्टिक लावू शकता.
गोऱ्या वर्णाच्या मुलींना बरेच लिपस्टिक शेड्स सूट होतात. त्यांना सॉफ्ट पिंक किंवा पीच,न्यूड, चेरी रेड, मोव्ह हे शेड्स उठून दिसतात.
मध्यम वर्णाच्या मुलींना गव्हाळ रंगासाठी मव, वॉर्म न्यूड, पीच, कोरल, टेराकोटा हे लिपस्टिक शेड्स आकर्षक दिसतात.
काळ्या वर्णाच्या मुलींना जास्त फॅशन न करता डीप रेड, बेरी प्लम, चॉकलेटी ब्राऊन आणि वाईन यांसारखे रिच आणि बोल्ड लिपस्टिक शेड्स उत्तम दिसतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.