Shruti Vilas Kadam
रोज ३० मिनिटं झुंबा केल्याने अनेक फायदे होतात. झुंबामध्ये सतत शरीराची हालचाल होत असल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणासाठी ते उपयुक्त ठरू शकते.
झुंबा हा कार्डिओ व्यायाम असल्याने हृदयाची कार्यक्षमता आणि एकूण कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस सुधारण्यास मदत होते.
नियमित ३० मिनिटांचा झुंबा केल्याने स्टॅमिना वाढण्यास आणि दैनंदिन कामांमध्ये जाणवणारा थकवा कमी होण्यास मदत होते.
झुंबामध्ये हात, पाय, कंबर आणि कोअर यांची हालचाल होते. त्यामुळे शरीराच्या विविध स्नायूंचा व्यायाम होतो.
गाणी आणि डान्सच्या हालचालींमुळे झुंबा मजेदार वाटतो. नियमित व्यायामामुळे मूड आणि मानसिक आरोग्याला फायदा होऊ शकतो.
वेगवेगळ्या डान्स स्टेप्स केल्याने शरीराचा समन्वय, संतुलनामुळे शरिराची लवचिकता जास्त वाढते.
वर्कआउटपेक्षा झुंबा अधिक मनोरंजक वाटतो. त्यामुळे रोज ३० मिनिटे व्यायाम करण्याची सवय करणे कठीण वाटत असेल तर झुंबा उत्तम पर्याय आहे.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.