Rice or Chapati: भात की चपाती? शरीराला जास्त एनर्जी, फायबर आणि प्रोटीन कशातून मिळते? जाणून घ्या ७ गोष्टी

Shruti Vilas Kadam

भात आणि चपाती दोन्हीमध्ये एनर्जी

भात आणि गव्हाची चपाती या दोन्ही पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. हे कार्बोहायड्रेट्स शरीराला एनर्जी देण्याचे काम करतात. त्यामुळे दोन्ही पदार्थ संतुलित आहाराचा आहेत.

Rice or Chapati | Social Media

भात तुलनेने लवकर पचतो

पांढरा भात अनेकांना तुलनेने सहज पचतो. त्यातील कार्बोहायड्रेट्सचे शरीरात विघटन होऊन एनर्जी मिळते. मात्र भात पचण्याचा वेग त्याचा प्रकार आणि शिजवण्याच्या पद्धतीवरही अवलंबून असतो.

Rice | yandex

चपातीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक

गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चपातीमध्ये पांढऱ्या भाताच्या तुलनेत फायबर अधिक असू शकते. फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास आणि पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होते.

Chapati | yandex

चपातीमध्ये प्रोटीनही असते

गव्हाच्या पिठामध्ये प्रोटीन असते. त्यामुळे चपातीमधून शरीराला प्रोटीनही मिळते. मात्र शरीराच्या दैनंदिन प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी डाळी, कडधान्ये, दूध, दही किंवा इतर प्रोटीनयुक्त पदार्थ खावीत.

chapati | pinterest

कॅलरीजचे प्रमाण सर्व्हिंगवर ठरते

भात की चपाती, यापैकी कोणत्या पदार्थातून जास्त कॅलरीज मिळतात हे त्याचे प्रमाण आणि बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवताना किती भात किंवा चपाती खाताय, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

White Rice

जास्त शारीरिक मेहनत करणाऱ्यांसाठी भात बेस्ट

दिवसभर शारीरिक श्रम करणाऱ्या किंवा व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना भात हा कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत ठरू शकतो. शरीराला आवश्यक एनर्जी मिळण्यासाठी भातासोबत डाळ, भाजी आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खावीत.

White Rice

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी चपातीच खावी का?

चपातीमधील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होऊ शकते. मात्र वजन कमी करण्यासाठी भात पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. भात किंवा चपाती योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.

Thali | Google

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Lunch THALI

Shankarpali Recipe: दिवाळीला 'ही' सोपी ट्रिक वापरुन घरच्या घरी झटपट बनवा तोंडात विरघळणाऱ्या खुसखुशीत शंकरपाळ्या

Shankarpali Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा