Manasvi Choudhary
जर तुम्ही रविवारी स्पेशल काहीतरी खास आणि चमचमीत करायचा विचार करत असाल तर तुम्ही झिंगा मसाला ट्राय करा.
घरच्या घरी झिंगा मसाला बनवण्याची रेसिपी सोपी आहे. तुम्ही सहज सोप्या पद्धतीने झिंगा मसाला बनवू शकता.
झिंगा मसाला बनवण्यासाठी झिंगा, कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, मसाला, तेल, मीठ आणि कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.
सर्वात आधी झिंगा स्वच्छ करून घ्या. नंतर यात हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावून बाजूला ठेवा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे, बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग होईपर्यंत चांगला परतून घ्या.
या मिश्रणात आले- लसूण पेस्ट, टोमॅटो घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा. नंतर यात मसाला, धना पावडर, गरम मसाला मिक्स करा.
आता या संपूर्ण मिश्रणात झिंगा मिक्स करा म्हणजे मसाला व्यवस्थित मिक्स होईल. यात गरम पाणी घालून झिंगा शिजवून घ्या.