Manasvi Choudhary
कपाटातली जुनी साडी कितीही जुनी झाली तरी ती महिलांना जपूनच ठेवायची असते. साडीवरील डिझाईन जर किंवा वर्क महिलांना आवडते.
जुन्या साडी तुम्ही फेकून देण्याऐवजी त्यापासून स्टायलिश ट्रेडिंग ड्रेसेस शिवू शकता.
अनारकली ड्रेस शिवायचा असल्यास तुम्ही जुनी सिल्क किंवा काठपदराची साडी निवडू शकता. हा लूक भारी दिसेल.
सध्या को-ऑर्ड सेट्स'ची प्रचंड क्रेझ आहे. साडीपासून एक स्टायलिश 'क्रॉप टॉप' आणि त्यासोबत 'पॅलाझो' किंवा 'धोती पँट' बनवा.
लाँग कुर्ती तुम्ही जुन्या साडीपासून बनवू शकता. ए-लाईन कुर्ती आणि जॅकेट पॅटर्न सध्या ट्रेंडमध्ये आहे.
जुन्या शिफॉन किंवा जॉर्जेट साड्यांपासून शरारा खूप सुंदर दिसतो. शरारा हा ड्रेस स्टायलिश लूक देतो. लग्नकार्यासाठी तुम्ही ट्रेडिशनल लूक म्हणून हा पॅटर्न निवडू शकता.
साडीपासून एक 'काफ्तान' स्टाईल ड्रेस किंवा 'मिडी ड्रेस' बनवा. कमरेला साडीच्या काठाचाच एक बेल्ट तयार करा.