Shruti Vilas Kadam
खोपोली येथील झेनिथ धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेले पर्यटक दुपारच्या सुमारास नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने अडकून पडले.
घटनेची माहिती मिळताच खोपोली येथील हेल्फ फाऊंडेशनच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने बचाव मोहीम सुरू केली.
अडकलेल्या पर्यटकांमध्ये दीड वर्षांचे बालक, महिला तसेच काही ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश असल्याने बचावकार्य अधिक आव्हानात्मक ठरले.
बचाव पथकाने दोरीचा वापर करून एकामागून एक पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. काहींना पाठीवर घेऊन नदी पार करण्यात आली.
दीर्घ प्रयत्नांनंतर बचाव पथकाने सर्व पर्यटकांची कोणतीही जीवितहानी न होता सुखरूप सुटका करण्यात यश मिळवले.
सततच्या पावसामुळे नदी आणि धबधब्यांतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो. त्यामुळे पर्यटकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच पर्यटनस्थळांना भेट द्यावी.
हेल्फ फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या धाडसी बचावकार्याचे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून कौतुक होत आहे.