ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' लवकरच सुरू होणार आहे. लवकरच या शोचा प्रोमो आणण्याची योजना सुरु आहे.
या सीझनमध्ये सलमान खान व्यतिरिक्त इतर अनेक होस्ट असतील असे म्हटले जात आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या एका खेळाडूची Ex पत्नी चर्चेत आहे.
धनश्री वर्मा एक प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर, युट्यूबर आणि डेंटिस्ट आहे.
रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस टीमने धनश्री वर्माशी संपर्क साधला आहे. जर ती शोमध्ये आली तर ते सर्वांसाठी मनोरंजक असेल.
खरंतर, युजवेंद्र चहलचा पत्नी धनश्री वर्माशी या वर्षी डिवोर्स झाला आहे. दोघांनीही २०२० मध्ये लग्न केले होते.
या डिवोर्स नंतर धनश्री वर्माला सर्वांनी ट्रोल केले. दुसरीकडे, ती सतत तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.
युजवेंद्र चहलच्या डिवोर्सनंतर त्याचे नाव आरजे महवशशी जोडले जात आहे. खरंतर, या आयपीएल हंगामात ती त्याला पाठिंबा देताना दिसली होती.
अलिकडेच, कपिल शर्माच्या शोमध्ये आलेल्या युजवेंद्र चहलनेही सर्वांना त्यांच्या नात्याबद्दल एक संकेत दिला. तो असे म्हणताना दिसला - संपूर्ण भारताला याबद्दल माहिती आहे.