ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनुष्का शर्मा ही बॉलिवूडची अभिनेत्री आहे. हिने अनेक वेळा चित्रपटांमध्ये बाईक चालवताना बघितले आहे. रब ने बना दी जोडी आणि जान या चित्रपटांमध्ये अनुष्का बाईक चालवताना दिसली आहे.
सोनाक्षी सिन्हा हि त्या बॉलिवूड अभिनेत्रीनं मधली एक आहे ज्यांना बाईक चालवायची आवड आहे. सोनाक्षीला अनेक वेळा बाईक चालवताना बघितले आहे
गुल पनाग हिला बाईक आणि कार चालवण्याची खुप आवड आहे. अनेक वेळा तीला बुलेट चालवताना बघितले आहे. गुल पनागकडे स्वत:ची बाईक सुध्दा आहे.
श्रध्दा कपूर सुध्दा बाईक चालवणाऱ्या अभिनेत्रीच्या लिस्टमध्ये समाविष्ट आहे. तिने खुपदा बाईक चालवून शूट केले आहे. वास्तविक जीवनात श्रद्धा बाईक चालवते.
कतरिना कैफला बाईक राईड करायला आवडते. अनेक चित्रपटांमध्ये कतरिना बाईक चालवताना दिसली आहे.
करिना कपूर खान हि एका चित्रपटा करिता बाईक चालवायला शिकली होती. वास्तविक जीवनात करिनाला बाईक राईड करायला आवडतात.
ईशा गुप्ता ही अभिनेता इमरान हाशमी सोबत एका गाण्यात "मैं रहूं या ना रहूं" मध्ये बाईक चालवताना दिसून आली.