ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रणवीर सिंग यांचा जन्म ६ जुलै १९८५ रोजी मुंबईतील एका सिंधी कुटुंबात झाला.
रणवीर सिंग याने मुंबईतील एच.आर. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्समधून शिक्षण घेतले.
रणवीर सिंग हा त्याचे पुढिल शिक्षण घेण्याकरिता अमेरिकेत गेला. त्याने तेथून अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठातून कला शाखेची (BA) पदवी मिळवली.
रणवीर सिंग हा सुप्रसिध्द बॉलिवूड अभिनेता आहे. त्याला बॉलिवूडचा एनर्जेटिक अभिनेता म्हणून ओळखले जाते.
'बॅन्ड बाजा बारात' (Band Baaja Baarat) या चित्रपटातून त्यांनी 2010 मध्ये पदार्पण केले.
'लेडीज vs. RC', 'लुटेरा', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'सिम्बा', 'गली बॉय' अशा अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
रणवीर सिंग याने अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत लग्न केले आहे.
रणवीर सिंग हा त्याच्या फॅशन सेन्ससमुळे प्रचंड चर्चेत असतो.
रणवीर सिंग यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात फिल्मफेअर पुरस्कार, स्क्रीन पुरस्कार आणि आयफा पुरस्कारांचा समावेश आहे.