Blood Sugar Control: शुगर वाढलंय? मग 'या' ३ उपायांनी तुम्ही ती नियंत्रणात ठेवू शकता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नैसर्गिक उपाय

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हे तीन घरगुती आणि नैसर्गिक उपाय खूप उपयुक्त ठरू शकतात, असं तज्ज्ञ मानतात.

नियमित आहार

नियमित आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

वैद्यकीय सल्ला घेणे

कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे, आरोग्याच्या दृष्टीने हे सुरक्षित ठरते.

व्यायाम करा

दररोज 30-45 मिनिटे चालणे, सायकलिंग, योगासने जसे सूर्यनमस्कार, भुजंगासन केल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.

नियंत्रित आहार

ज्वारी, बाजरी, ओट्ससारखी संपूर्ण धान्ये, पालक-मेथीसारख्या पालेभाज्या आणि डाळ-चण्यासारखे प्रथिनयुक्त पदार्थ मधुमेहासाठी उपयुक्त ठरतात, कारण त्यांचा GI कमी असतो.

तणाव व्यवस्थापन

तणाव कमी करण्यासाठी अनुलोम-विलोम, ध्यान आणि डीप ब्रीदिंगचा सराव उपयुक्त ठरतो, तसेच दररोज 7-8 तास झोप घेणेही आवश्यक आहे.

शुगर चेक करा

दर 3 ते 6 महिन्यांनी फास्टिंग, जेवणानंतरची साखर (PPBS) आणि HbA1c तपासून मधुमेहाची स्थिती नियंत्रित आहे की नाही हे तपासा.

टॉक्सिन्स बाहेर पडतात

दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि चयापचय क्रिया सुरळीत राहून आरोग्य चांगले राखले जाते.

NEXT: दररोजच्या 5 सवयी ज्यामुळे डोकेदुखीची समस्या वाढते, वाचा

येथे क्लिक करा