Surabhi Jayashree Jagdish
हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर शरीरात काही संकेत दिसून येतात.
ही लक्षणं नेहमीच स्पष्ट नसली तरी महिनाभर आधीपासून जाणवू शकतात. ही लक्षणं कोणती आहेत ती जाणून घेऊया.
थोडंसं काम केलं तरी अंगाला जड वाटणं, थकल्यासारखं जाणवणं.
अधूनमधून छातीत दुखणं, दाब जाणवणं किंवा जळजळ होणं.
जिने चढताना किंवा चालताना अचानक दम लागणे.
डाव्या खांद्यात, हातात किंवा जबड्यात बोथट वेदना जाणवणे.
साध्या हवेत किंवा थंडीतही घाम फुटणे.
झोप नीट न लागणे, मध्येच श्वास गुदमरल्यासारखा होऊन जाग येणे.