Protein-rich vegetables: या भाज्यांमधून तुम्हाला मिळेल भरपूर प्रोटीन

Surabhi Jayashree Jagdish

प्रोटीन का महत्त्वाचं?

प्रोटीन हे स्नायूंची निर्मिती, पेशींची दुरुस्ती आणि शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं प्रमुख पोषक तत्त्व आहे. रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यात आणि शरीरातील अनेक एन्झाइम आणि हार्मोन्स तयार करण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका असते.

Plant-based protein | saam tv

हिरवे वाटाणे

हिरवे वाटाणे प्रोटीनयुक्त भाज्यांमध्ये अग्रस्थानी मानले जातात. एका कप हिरव्या वाटाण्यात सुमारे 8 ग्रॅम प्रोटीन आढळतं, त्यामुळे ते शाकाहारींसाठी उत्कृष्ट पर्याय आहेत.

Healthy vegetables | saam tv

ब्रोकली

100 ग्रॅम ब्रोकलीमध्ये सुमारे 2.8 ग्रॅम प्रोटीन मिळतं. यासोबतच ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K आणि अँटीऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात असल्याने ती आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

Spinach | saam tv

पालक

पालक ही पालेभाजी प्रोटीनबरोबरच लोह, कॅल्शियम आणि फोलेटचा चांगला स्रोत आहे. एका कप शिजवलेल्या पालकामध्ये सुमारे 5.3 ग्रॅम प्रोटीन मिळतं. त्यामुळे रोजच्या आहारात पालकाचा समावेश केल्यास प्रोटीनसह अनेक आवश्यक पोषक घटक शरीराला मिळतात.

Muscle building foods | saam tv

फणस

फणसाला अनेकदा 'शाकाहारी चिकन' असं म्हटलं जातं. 100 ग्रॅम फणसामध्ये सुमारे 1.8 ते 2.5 ग्रॅम प्रोटीन आढळतं. जरी त्यातील प्रोटीनचं प्रमाण वाटाणे किंवा पालकापेक्षा कमी असले, तरी संतुलित आहाराचा भाग म्हणून तो चांगला पर्याय ठरू शकतो.

Healthy diet | saam tv

भाज्यांवर प्रोटीनची गरज पूर्ण होते का?

प्रोटीनयुक्त भाज्या उपयुक्त असल्या तरी शरीराची संपूर्ण प्रोटीनची गरज फक्त भाज्यांमधून भागवणे अनेकदा कठीण असते. त्यामुळे कडधान्ये, डाळी, सोयाबीन, राजमा, हरभरा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचाही आहारात समावेश करणं आवश्यक आहे.

Plant protein sources | saam tv

प्रोटीनयुक्त भाज्या

भाज्या जास्त वेळ शिजवल्यास काही पोषक घटक कमी होऊ शकतात, त्यामुळे त्या वाफवून किंवा हलक्या आचेवर शिजवणं अधिक योग्य ठरतं. प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यासाठी या भाज्या डाळी, कडधान्ये किंवा संपूर्ण धान्यांसोबत खाणे फायदेशीर असतं.

Vegetarian diet | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Pain | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Cinnamon water | saam tv
येथे क्लिक करा