Akola Tourism: अकोल्याच्या जवळच दडलीये निसर्गाची जादू; 'या' हिल स्टेशनला एकदा भेट द्या, डोकं होईल शांत!

Surabhi Jayashree Jagdish

अकोला

अकोल्याजवळ असलेल्या एका सुंदर हिल स्टेशनबद्दल तुम्हाला माहितीये का? या ठिकाणाची नैसर्गिक सुंदरता पर्यटकांना खूप आकर्षित करते. शांत वातावरणामुळे इथे गेल्यावर मन प्रसन्न होते.

Maharashtra Hill Station

इगतपुरी

या अप्रतिम हिल स्टेशनचं नाव इगतपुरी आहे. हे ठिकाण आपल्या हिरव्यागार निसर्गासाठी प्रसिद्ध आहे. इथे गेल्यावर स्वित्झर्लंडची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

Weekend Getaway Maharashtra

अंतर

इगतपुरी हे अकोल्यापासून सुमारे 450 किलोमीटर अंतरावर आहे. हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वसलेलं आहे. रस्त्याने प्रवास करताना देखील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो.

Nature Trip Near Akola

पावसाळा

हे हिल स्टेशन घनदाट जंगल आणि सुंदर धबधब्यांसाठी ओळखले जाते. पावसाळ्यात याठिकाणी निसर्गाचे सौंदर्य आणखी खुलून दिसतं. फोटोग्राफीसाठीही हे ठिकाण उत्तम मानले जाते.

Igatpuri Travel Guide

हवामान

इगतपुरी समुद्रसपाटीपासून सुमारे 600 मीटर उंचीवर वसलेलं आहे. यामुळे इथे हवामान नेहमीच आल्हाददायक असते. थंडगार वाऱ्यामुळे पर्यटकांना विशेष आनंद मिळतो.

Best Places In Igatpuri

विकेंडसाठी पर्याय

वीकेंड किंवा सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्यासाठी हे ठिकाण उत्तम पर्याय आहे. तुमची फॅमिली आणि मित्रांसोबत इथे चांगला वेळ घालवता येतो. निसर्गप्रेमींना हे ठिकाण विशेष आवडतं.

Igatpuri Nature Views

थोडी शांतता

शहराच्या गोंगाटापासून दूर शांतता अनुभवायची असेल तर इगतपुरीला जरूर भेट द्या. येथील डोंगर, धुके आणि हिरवाई मन मोहून टाकतात. एकदा येथे गेल्यावर पुन्हा पुन्हा यावेसं वाटतं.

Travel Near Nashik
येथे क्लिक करा