Historical Places: पर्यटनाच्या प्रेमात पडाल! भारतातील हे ७ प्राचीन किल्ले तुमचं मन जिंकतील

Dhanshri Shintre

चित्तोडगढ किल्ला, राजस्थान

राजस्थानातील चित्तोडगढ किल्ला हा ७०० एकरांवर पसरलेला भारतातील सर्वात मोठा किल्ला असून, तो राजपूत शौर्य आणि मेवाडच्या इतिहासाचे प्रतीक आहे.

ग्वाल्हेर किल्ला, मध्य प्रदेश

ग्वाल्हेर किल्ला, ज्याला 'भारताचा जिब्राल्टर' म्हणतात, सहाव्या शतकात उगम पावलेला असून, विविध राजवंशांच्या इतिहासाची साक्ष देतो.

कांगडा किल्ला, हिमाचल प्रदेश

कांगडा किल्ला, भारतातील प्राचीन किल्ल्यांपैकी एक, मुघलांपूर्वी कटोच राजवंशाने उभारलेला असून त्याचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे.

दौलताबाद किल्ला, महाराष्ट्र

औरंगाबादच्या जवळ वसलेला दौलताबाद किल्ला पूर्वी देवगिरी म्हणून ओळखला जात होता आणि तो भारतातील अत्यंत अजेय आणि भक्कम किल्ल्यांपैकी एक आहे.

जैसलमेर किल्ला, राजस्थान

सोनार किल्ला म्हणून ओळखला जाणारा जैसलमेर किल्ला खास आहे, कारण तो आजही लोकवस्ती असलेला जगातील थोडक्याच जिवंत किल्ल्यांपैकी एक आहे.

गोलकोंडा किल्ला, तेलंगणा

एकेकाळी प्रसिद्ध हिऱ्यांचा बाजार असलेला हा किल्ला कोहिनूर हिऱ्याचे मूळ स्थान मानला जातो, त्याची ध्वनिसंवेदनशील रचना पर्यटकांना भुरळ घालते.

लाल किल्ला, दिल्ली

इतर किल्ल्यांपेक्षा तुलनेने नविन, लाल किल्ला १७व्या शतकात शाहजहानने बांधला असून आजही तो भारताच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहे.

NEXT:  पुण्यातील प्रति बालाजी मंदिर कोणी बांधले? ९९% लोकांना माहित नसेल

येथे क्लिक करा