Dhanshri Shintre
पुणे जिल्ह्यात पुण्यापासून ४० किमी अंतरावर पुरंदर किल्लयाच्या परिसरात केतकावळे छोटंस गाव आहे.
या छोट्यासा गावामध्ये प्रति तिरुपती बालाजी मंदिर आहे.
व्यंकटेश्वरा हॅचरीज ट्रस्ट या समुहाचे संस्थापक डॉ. बी. व्ही. राव यांची बालाजीवर अफाट श्रद्धा होती.
त्यांचे हे कुलदैवत त्यांना चेन्नईला तिरुपतीला जाणं शक्य होत नव्हतं खूप खर्च व्हायचा. कारण गरीब लोक तिथे जाऊन पोहचू शकत नाही.
बालाजीचं मंदिर केतकावळे गावी उभं करायचं अशी त्यांची इच्छा होती.
त्यांच्या हयातीत ही इच्छा पूर्ण झाली नाही, नंतर त्यांच्या मुलांनी त्यांची ही इच्छा पूर्ण केली.
ह्या मंदिराचा परिसर २३०० एकराचा आहे.
याच गावात व्यंकटेश्वरा हॅचरीज या उद्योगसमूहाच्या ट्रस्टने प्रति तिरुपती बालाजी मंदिर बांधलं आहे.