AC Temperature: तुमच्या आरोग्यासाठी एसीचे योग्य तापमान किती असावे? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक ऋतूमध्ये वेगळं तापमान

प्रत्येक ऋतूमध्ये एसीसाठी आदर्श तापमान वेगळं असतं, पण अनेक लोक 16-18°C पर्यंत तापमान कमी करून थंडावा मिळवतात.

आरोग्यास हानीकारक

अत्यधिक थंडी आरोग्यास हानीकारक ठरू शकते तसेच एसी जास्त वापरल्यामुळे वीज बिलही वाढते, त्यामुळे तापमान योग्य ठेवणं आवश्यक आहे.

एसीचे योग्य तापमान

तुम्ही थंड आणि आरोग्यदायी राहण्यासाठी एसीचे योग्य तापमान कोणते असावे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

सर्दी-खोकला

अत्यंत थंड तापमानामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्यामुळे सर्दी-खोकला व फ्लूचा धोका वाढू शकतो.

किती डिग्री सेल्सिअस

ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीच्या (BEE) मार्गदर्शनानुसार, एसीसाठी योग्य तापमान 24 ते 26 डिग्री सेल्सिअस ठेवणं फायदेशीर आहे.

एसीचे तापमान

एसी 24°C ते 26°C तापमानावर ठेवून चालवल्याने शरीराला आराम मिळतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारली जाते, ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो.

सिलिंग फॅन

एसीसह सिलिंग फॅन वापरणं आणि टायमर सेट करणं आवश्यक आहे, ज्यामुळे थंडावा टिकतो आणि वीज बिलात बचत होते.

NEXT: सतत डोकेदुखी होत असेल तर ही ७ लक्षणे तपासा, ही असू शकते मायग्रेनची सुरुवात

येथे क्लिक करा