एका महिन्यात घटवू शकता २-३ किलो वजन; 'या' सोप्या टीप्सचा करा वापर

Surabhi Jayashree Jagdish

वजन कमी करणं

वजन कमी करण्यासाठी कधी-कधी शरीराला रीसेट करण्याची गरज असते. यासाठी अतिशय कडक आहार किंवा तासन्‌तास व्यायाम करण्याची आवश्यकता नसते. कारण यामुळे मेटाबॉलिझम पुन्हा एक्टिव्ह होतो.

सोप्या आणि प्रभावी सवयी

जाणून घेऊया अशा सोप्या आणि प्रभावी सवयींबद्दल ज्या तुम्हाला एका महिन्यात २–३ किलो वजन कमी करण्यात मदत करू शकतात. या सवयी सहजपणे अवलंबता येतात. आणि त्यांचा परिणामही लवकर दिसतो.

सकाळी गरम पाणी प्या

गरम पाणी सकाळी-सकाळी डिटॉक्स वॉटरसारखं काम करतं. हे शरीरातील टॉक्सिन घटक बाहेर टाकण्यास, पचनसंस्था सुधारण्यास आणि सकाळच्या ब्लोटिंगला कमी करण्यास मदत करतं.

बॉडी क्लॉकनुसार खा

जर तुम्ही दिवसा अधिक आणि रात्री कमी खाल्लं तर तुमचं पचन आणि फॅट बर्निंग दोन्ही सुधारतं. दुपारी १२ ते ३ दरम्यान सर्वात मोठा जेवणाचा वेळ ठेवा आणि रात्रीचे जेवण हलके ठेवा, तेही सूर्यास्तापूर्वी.

फायबरयुक्त भाज्या खा

जेवणात कॅलरी कमी करण्याऐवजी फायबरवर लक्ष केंद्रित करा. यासाठी प्रत्येक जेवणापूर्वी अर्धी प्लेट कच्च्या किंवा सौम्य स्टीम केलेल्या भाज्या खा. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं.

प्रत्येक जेवणानंतर २० मिनिटं चालणं

जेवणानंतर चालणं अत्यंत आवश्यक आहे. संशोधनानुसार, प्रत्येक जेवणानंतर २० मिनिटं चालल्यास रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि पचन सुधारतं. यामुळे शरीर एक्टिव्ह राहतं आणि संध्याकाळच्या खाण्याच्या इच्छाही कमी होतात.

रात्री अंधाऱ्या खोलीत झोपा

चांगली झोप केवळ विश्रांतीसाठीच नव्हे तर फॅट बर्निंगसाठीही आवश्यक असते. पूर्णपणे अंधाऱ्या खोलीत झोपल्याने मेलाटोनिन हार्मोन वाढतो जो मेटाबॉलिझमला चालना देतो. यामुळे शरीर लवकर रिकव्हर होतं.

Sindhudurg Tourism: सिंधुदूर्गात लपलेला शिवकाळातील दुर्मिळ किल्ला! महाराजांच्या साम्राज्यातील गुप्त रणनीतीस्थळ

Sindhudurg Tourism | saam tv
येथे क्लिक करा