Surabhi Jayashree Jagdish
धमन्या ब्लॉक होणं हे कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचं एक प्रमुख कारण आहे. यामुळे हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. रक्तप्रवाह कमी झाल्याने शरीरातील अवयवांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही.
ब्लॉक झालेल्या धमन्यांमुळे फक्त हृदयच नाही तर संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. मेंदूपर्यंत योग्य रक्तपुरवठा न झाल्यास स्ट्रोकचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही समस्या अनेक अवयवांसाठी गंभीर ठरू शकते.
डॉक्टरांच्या मते, लहान पण सातत्यपूर्ण दैनंदिन सवयींमुळे धोका कमी करता येतो. सुरुवातीच्या टप्प्यातच काळजी घेतल्यास औषधांवर अवलंबून राहावं लागत नाही.
स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. परिणामी धमन्यांवरील ताण कमी होऊन त्या अधिक निरोगी राहतात.
ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स सूज कमी करण्यास मदत करतात. यामुळे धमन्यांमध्ये प्लाक जमा होण्याचा वेग कमी होतो. मासे, अक्रोड आणि चिया सीड्स यामधून हे पोषक घटक मिळतात.
सातत्यपूर्ण आणि योग्य झोप हार्मोन्स संतुलित ठेवते. यामुळे शरीरातील कॉर्टिसोलची पातळी कमी होते. धमन्यांच्या आतील भिंती सुरक्षित राहण्यास मदत मिळते.
तणाव नियंत्रणासाठी श्वसन व्यायाम, ध्यान किंवा दररोज चालणं उपयोगी ठरतं. या सवयी नर्व्हस सिस्टीमला शांत ठेवतात. परिणामी हृदय आणि धमन्यांवरचा ताण कमी होतो आणि आरोग्य सुधारते.