Shruti Vilas Kadam
दीर्घ श्वसनामुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि मानसिक तणाव कमी होतो. रोज १० मिनिटे प्राणायाम केल्याने मन स्थिर राहते.
बालासन केल्याने मेंदू शांत होतो, पाठीचा ताण कमी होतो आणि मानसिक थकवा दूर होतो. ऑफिस स्ट्रेससाठी हे आसन खूप फायदेशीर आहे.
सुखासनात बसून ध्यान केल्याने मन शांत होते आणि चिंता कमी होते. हे योगासन रोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी करता येते.
भुजंगासन केल्याने छाती उघडते, रक्ताभिसरण सुधारते आणि मूड फ्रेश होतो. तणाव व नैराश्य कमी करण्यासाठी उपयुक्त आसन आहे.
शवासनामुळे शरीर आणि मन पूर्णपणे रिलॅक्स होते. योगासनांच्या शेवटी ५–१० मिनिटे शवासन केल्याने स्ट्रेस लेव्हल कमी होते.
हे श्वसन तंत्र नर्व्ह सिस्टीम शांत करते, हृदयाची गती नियंत्रित करते आणि मानसिक तणाव कमी करते.
दररोज ध्यान केल्याने नकारात्मक विचार कमी होतात, आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक संतुलन राखले जाते.