Shruti Vilas Kadam
बेसन त्वचा खोलवर स्वच्छ करतो तर दूध मेकअप सहज काढून स्किन सॉफ्ट ठेवते. दोन्ही एकत्र करून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा व कोमट पाण्याने धुवा.
मध नैसर्गिक क्लींजर आहे तर गुलाबजल त्वचेला थंडावा देते. हे मिश्रण हलक्या हाताने लावल्यास हलका मेकअप सहज निघतो.
एलोवेरा स्किनला शांत करते आणि नारळ तेल वॉटरप्रूफ मेकअप काढण्यास मदत करते. कोरड्या व संवेदनशील त्वचेसाठी हा फेसवॉश उपयुक्त आहे.
ओट्स त्वचेतील घाण व मेकअप शोषून घेतात, तर दही त्वचेला पोषण देते. सौम्य स्क्रबिंगसाठी हा घरगुती फेसवॉश वापरता येतो.
काकडी रस त्वचा फ्रेश ठेवतो आणि लिंबू रस मेकअपचे डाग दूर करतो. ऑइली स्किनसाठी हा फेसवॉश विशेष फायदेशीर आहे.
दूध मेकअप वितळवते तर बदाम तेल त्वचेला मॉइस्चर देते. रात्री झोपण्यापूर्वी वापरल्यास त्वचा मऊ आणि स्वच्छ राहते.
तांदळाचे पीठ नैसर्गिक क्लिंझर आहे जे मेकअप व डेड स्किन काढते. गुलाबजल मिसळून वापरल्यास त्वचेचा ग्लो वाढतो.