Shruti Vilas Kadam
१ पिकलेलं केळं, २ चमचे दही, १ चमचा मध आणि १ चमचा खोबरेल तेल घ्या.
केळं नीट मॅश करून त्यात दही, मध आणि तेल घालून गुळगुळीत पेस्ट बनवा. गाठी राहू देऊ नका.
केस थोडेसे ओले किंवा स्वच्छ ठेवा, त्यामुळे मास्क केसांमध्ये नीट शोषला जातो.
मुळांपासून टोकांपर्यंत मास्क समप्रमाणात लावा. विशेषतः कोरडे व फाटलेले टोक लक्षात घ्या.
हा मास्क केसांवर २०–३० मिनिटे ठेवावा. शॉवर कॅप घातल्यास अधिक फायदा होतो.
सौम्य शॅम्पूने केस नीट धुवा. केळ्याचे तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्या.
आठवड्यातून १ वेळा वापर केल्यास केस मऊ, चमकदार आणि मजबूत होतात.