Manasvi Choudhary
रोजच्या धकाधकीच्या जीवनपध्दतीमुळे शारीरिक काळजी घेता येत नाही.
वाढत्या वायूप्रदूषणामुळे त्वचेची चमक कमी होऊ लागली आहे.
यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, त्वचा काळी पडणे, मुरूम यासांरख्या समस्या उद्भवतात.
मात्र नियमितपणे योगा केल्यास त्वचा निरोगी होते यामुळे चेहऱ्याची चमकही कायम राहते.
हलासन योगामध्ये सर्वात आधी पाठीवर झोपावे. श्वास घेताना, पाय वरच्या दिशेने उचलून डोक्याच्या मागे घ्या. अंगठ्याने जमिनीला स्पर्श करून हात जमिनीवर सरळ ठेवा आणि कंबर जमिनीला घट्ट ठेवा. काही वेळ या स्थितीत रहा आणि नंतर श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत या.
हा योग सर्वात आधी जमिनीवर झोपा आणि दोन्ही तळवे जमिनीवर खांद्याच्या रुंदीच्या अंतरावर ठेवा. तुम्हाला शरीराचा खालचा भाग जमिनीवर ठेवून श्वास घ्यावा लागेल आणि त्याचवेळी छाती जमिनीवरून उचलून छताकडे पहावे लागेल. शेवटी, श्वास सोडताना, शरीर परत जमिनीवर आणा.
उत्तानासन करण्यासाठी सरळ उभे राहा. नंतर कमरेच्या वरच्या भागात श्वास घेताना पायाच्या बोटांना स्पर्श करावा. काही वेळ या स्थितीत राहिल्यानंतर, श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत या. हा योग करताना लक्षात ठेवा की तुमचे गुडघे वाकलेले नसावेत.