Shraddha Thik
योग करताना या चुका करणे टाळा, योगासन केल्याने शरीर निरोगी राहते.
स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आपण सगळं काही करतो. सकस आणि पौष्टीक आहार घेतो तसेच व्यायाम आणि योगा करतो.
शरीर निरोगी राहते. तुम्ही देखील योगासन घरी करत असाल तर योगासन करताना या चुका करणे टाळा.
योगासने करत असताना शरीरातील उष्णतेची पातळी हळूहळू वाढते.
अशा परिस्थितीत जर कोणी थंड पाण्याचे सेवन केले तर उष्णतेची पातळी झपाट्याने खाली येऊ शकते. त्यामुळे लगेच पाणी पिऊ नये.
योग करताना घाई करू नये. योगसाठी एकाग्रता असणं आवश्यक आहे. योगसाठी पूर्ण वेळ द्या. असं केल्यानेच योगा केल्याचा फायदा मिळतो.
योगासन ठराविक वेळेत करा योगासने करण्याची वेळ आहे, वास्तविक, ब्रह्म मुहूर्त हा योगासने करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो कारण यावेळी झोपल्यानंतर शरीराला आराम मिळतो. योग दुपारी किंवा रात्री करू नये.