Shreya Maskar
ठाण्यातील येऊर हे शांत आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखले जाते.
जोडीदारासोबत वीकेंड घालवायला येऊर बेस्ट डेस्टिनेशन आहे.
निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करण्याचा मनसोक्त आनंद तुम्ही येथे घेऊ शकता.
येथील नागमोडी वळणाच्या पायवाटा पर्यटकांना आकर्षित करतात.
ओले चिंब रस्ते आणि हिरवेगार डोंगर येऊरचे सौंदर्य वाढवतात.
येऊर हे पक्षीप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. विविध जातीचे पक्षी तुम्हाला येथे पाहायला मिळतील.
येऊरला जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्टेशनपासून तुम्ही बस आणि रिक्षाने जाऊ शकता.
पांढरे शुभ्र वाहणारे धबधबे पाहताना आल्हाददायक वाटते.
तुम्ही येथे सायकलिंगचा भन्नाट आनंद लुटू शकता.
कुटुंबासोबत वन डे पिकनिकसाठी हे उत्तम ठिकाण आहे.