Saam Tv
दात पिवळे झाल्यामुळे हसतानाही लाज वाटते. पिवळेपणापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक महागडे इलाजही केले जातात. पण तुम्हाला माहित आहे का काही घरगुती उपाय करून दात एका रात्रीत चमकवू शकता.
शुद्ध नारळाचे तेल दात पांढरे करण्यासाठी वापरले जाते. हा एक भारतीय जुना उपाय आहे. १ चमचा नारळाचे तेल तोंडात घ्या आणि २० मिनिट गुळण्या करा किंवा तेल दातांवर घासा. नारळात असलेल्या फॅटी अॅसिडमुळे पिवळेपणा निघून जातो.
अॅपल साईड व्हिनेगरचा वापर माऊथवॉश म्हणून करू शकता. २ चमचे अॅपल साईड व्हिनेगरमध्ये थोडं पाणी मिसळा आणि गुळण्या करा. हे ब्लीचिंग एजंड असल्याने दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत होते. हे अॅसिडिक असल्याने सावधगिरीने याचा वापर करावा.
लिंबूवर्गीय फळांमध्ये डी-लिमोनीन हा एक क्लिनींग एजंट असतो. ही फळ खाल्याने किंवा हि फळ दातांना १० मिनिटे चोळण्याने पिवळेपणा गायब होतो. जास्त चोळल्याने हिरड्या, इनॅमल लेअरवर परिणाम करू शकतो.
शुद्ध चारकोलचा वापर हा दातांसाठी उत्तम मानला जातो. तोंडात असणारे टॉक्सिन्स आणि बॅक्टेरिया चारकोलमुळे कायमचे दूर होतात. चारकोलमुळे दातांचे आरोग्य सुधारते.
स्ट्रॉबेरी मॅश करून दातांवर चोळल्याने त्यातील मॅलिक अॅसिडमुळे पिवळेपणा कमी होण्यास मदत होते.
मीठ नुसते दातांवर चोळू शकता. किंवा मीठात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळून दातांवर घासा. यामुळे पिवळेपणा कमी होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावी