Saam Tv
घरच्या घरी चीझकेक बनवणे खरं तर खूप सोपं आहे. नो- बेक चीझकेक म्हणून झटपट चीझकेक तयार करता येतो.
बिस्किट्स ( १५ ते २० ), बटर (४ - ५ चमचे ), क्रिम चीझ ( २०० ग्रॅम ), विपिंग क्रिम ( १ कप ), पिठिसाखर ( आवडीनुसार ), व्हॅनिला इसेन्स ( १ लहान चमचा ), स्ट्रॉबेरी किंवा आंबा जॅम क्रश टॉपिंगसाठी
बिस्किट्स मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यात वितळलेले बटर घाला. व्यवस्थिक मिक्स करा.
बिस्किट्स मिश्रण केकच्या भांड्यात सारखे पसरवून सेट करा. हे भांड १० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.
एका भांड्यात क्रिम चीझ आणि पिठीसाखर एकत्र करून मऊ होईपर्यंत फेटा. दुसऱ्या भांड्यात विपिंग क्रिम घेऊन ती घट्ट होईपर्यंत फेटा.
आता फेटलेली विपिंग क्रिम, क्रिम चीझच्या मिश्रणात हळूवारपणे मिक्स करा. त्यात व्हॅनिला इन्सेस टाकून मिक्स करा.
फ्रिजमधून बिस्किट्सचा बेस बाहेर काढा. त्यावर तयार केलेले चीझ क्रिम मिश्रण ओता. मिश्रण पसरवा. सेट होण्यासाठी ६ ते ७ तास फ्रिजमध्ये ठेवा. ( फ्रिजरमध्ये न ठेवू नका)
केक छान सेट झाल्यावर बाहेर काढा. त्यावर आवडीनुसार स्ट्रॉबेरी जॅम किंवा मँगो क्रश पसरवा. केकचे थंडगार काप कापून सर्व्ह करा